मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (15:54 IST)

ईएमआय भरून कपडे खरेदी करा

मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने भारतातील पहिली कपड्यांची ईएमआयवर विक्री सुरू केली आहे.  यासाठी दरमहिन्याला 51 रूपयांचा ईएमआय भरावा लागेल. 3 ते 24 महिने असा ईएमआयचा कालावधी असेल. ज्या प्रमाणे आपण एखादी महागडी वस्तू खरेदी केल्यावर योग्य महिन्याचा प्लॅन निवडून ईएमआय भरतो तोच नियम कपडे खरेदीच्या बाबतीतही लागू होतो आहे. 
 

क्रेडिट कार्ड वापरून महाग वस्तू खरेदी केल्यावर ज्याप्रकारे इन्स्टॉलमेंट विभागून मिळतात. तसंच या पॉलिसीमध्येही असेल. 1300 किंवा त्यापेक्षी कमी किंमतीची वस्तू मिंत्रावरून खरेदी केल्यानंतर ही ईएमआय पॉलिसी घेता येईल. त्यामुळे मिंत्रावरून कपडे, दागिने किंवा इतर वस्तू खरेदी करून तुम्हाला नंतर ईएमआय स्वरूपात पैसे भरता येतील. 

मिंत्राने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अॅमेक्स, एचएसबीसी यांसारख्या बँकाबरोबर मिंत्राची पार्टनरशीप आहे. याच बँका ईएमआय पॉलिसीमध्ये मदत करतील. या बँका खरेदीवर 13 ते 15 टक्के इंटरेस्ट आकारतील.