सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

बीएसएनलच्या प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर ६० टक्के डिस्काऊंट

बीएसएनलच्या नव्या ऑफरमध्ये  प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर ६० टक्के डिस्काऊंट दिला आहे.  सोबतच एक सिम कार्डही फ्रीमध्ये मिळणार आहे. ही ऑफर बीएसएनएलच्या नव्या आणि जुन्या पोस्टपेड ग्राहकांना मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत नवे कनेक्शन घेणाऱ्यांना कोणतेही सिम एक्टिवेशन चार्ज लागणार नाही. 
 
यात १,५२५ रुपयांचा प्रीमियम पोस्टपेड प्लान असेल तर यात ६० टक्के रेंटल डिस्काऊंट मिळू शकतो. या प्लानमध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉल, एसएमएस आणि डेटा दिला जातोय. दरम्यान, यासाठी १२,६ अथवा ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान निवडावा लागेल. तेव्हा तुम्हाला ६० टक्क्यांपर्यंत रेंटल डिस्काऊंट मिळेल. जर तुम्ही सहा महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर तुम्हाला ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर ३० टक्के डिस्काऊंट मिळेल.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अशाच प्रकारचा पोस्टपेड प्लान आणला होता. त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा रिलाँच केला.