शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिधावाटप दुकानात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळणार

महाराष्ट्र शासन शिधावाटप दुकानात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देण्याच्या तयारीत आहे. सरकारने यासंर्भातील निर्णय घेतलाय. 

शासनाच्या शिधावाटप दुकानांमध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, केरोसीन अशा वस्तू रास्त दरात मिळतात. यानंतर आता या पदार्थांसोबत दुधही मिळू शकणार आहे. महानंदा दुग्धशाळेतील हे पदार्थ असणार आहेत.

मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता संपूर्ण राज्यभरात रास्त भावात दुध आणि दुग्धजन्य पदार्थ शिधावाटप दुकानात मिळणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील २९०० रेशनदुकानांमधून हे पदार्थ मिळणार आहे.