शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नगर: पाच वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे

maharashtra news
नगर - संगमनेर तालुक्‍यातील माळेवाडी येथील एका पाच वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे करतांना एका पकडण्यात आले. युवकाने हस्तक्षेप केल्याने मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका झाली. या प्रकरणी आरोपीला आश्वी पोलिसांनी अटक केली आहे.
 
या बाबत अशोक विलास जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी साडेदहाच्या सुमारास माळेवाडी गावठाणातील मारुती मंदिराजवळून पायी जात असताना, लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने सभागृहात डोकावले असता, गावातीलच किसन गजाबा जाधव ( वय ६५ ) हा अल्पवस्त्रात सुमारे पाच वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे करतांना आढळला. त्याला दरडावल्याने त्याने तेथून काढता पाय घेतला.
 
या बाबत पीडित मुलीच्या आई वडीलांना व इतरांना सांगून, त्यांनी घडल्या प्रकाराबाबत आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपी किसन जाधव याला तत्काळ अटक केली. याचा उपविभागिय पोलिस अधिकारी अशोक थोरात पुढील तपास करीत आहेत.