बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 मार्च 2018 (16:55 IST)

वऱ्हाडी ट्रक नाल्यात कोसळला, २५ ठार

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून यात २५ जणांचा मृत्यू  झाला आहे. मंगळवारी सकाळी एक ट्रक नाल्यात कोसळून झालेल्या अपघात झाला. भावनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या ट्रकमध्ये वऱ्हाडी मंडळी होती. 

भावनगर-राजकोट महामार्गावर उमरालाजवळ हा ट्रक पलटी होऊन नाल्यात कोसळला. या ट्रकमध्ये जवळपास 60 माणसे होती. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी क्रेनची मदत घेतली असून अग्निशमन दलही बचाव मोहिमेत सहभागी झाले आहे.