शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जिथे शिकले होते गांधी, ती शाळा झाली बंद

राजकोट- गुजरातच्या राजकोट स्थित अल्फ्रेड हायस्कूल 164 वर्षांनंतर बंद करण्यात आले आहे. महात्मा गांधी याच शाळेत शिकले होते. ही शाळा आता संग्रहालयात परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ही शाळा मोहन दास गांधी हायस्कूल नावानेदेखील ओळखली जात होती.
मागल्या वर्षीच गुजराती मीडियमच्या या शासकीय शाळेला संग्रहालयात परिवर्तित करण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला होता. महात्मा गांधी 1887 साली 18 वर्षाच्या वयात या शाळेतून उत्तीर्ण झाले होते.
 
जिल्हा शिक्षा अधिकारी रेवा पटेल यांनी सांगितले की आम्ही सर्व 125 विद्यार्थ्यांना स्थानांतरण प्रमाणपत्र जारी करणे सुरू केले असून आता पुढील शैक्षणिक सत्रात ते आपल्या पसंतीच्या शाळेत प्रवेश घेऊ शकतील.
 
राजकोट नगर निगम आयुक्त बीएन पाणि यांनी सांगितले की ही इमारत आम्ही 10 कोटी रुपये खर्च करून संग्रहालयात परिवर्तित करण्याचा सल्ला घेत आहोत. या संग्रहालयात गांधीजी, सरदार पटेल आणि इतर महान लोकांचे जीवन परिचय प्रदर्शित केले जातील.
 
शाळेची स्थापना 17 ऑक्टोबर 1853 मध्ये ब्रिटिश काळात झाली होती. तेव्हा ही सौराष्ट्र क्षेत्रातील पहिली इंग्रेजी मीडियम शाळा होती. शाळेची इमारत 1875 साली जुनागढच्या नवाबांनी उभी केली होती आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिंस अल्फ्रेडचे नाव देण्यात आले होते. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचे नाव मोहनदास गांधी असे करण्यात आले होते.
 
शाळेशी गांधीची नाव जुळलेले आहेत पण येथे ‍शिक्षाचा रेकॉर्ड अत्यंत वाईट होता. काही वर्षांपूर्वी येथील 60 एसएससी विद्यार्थ्यांपैकी एकही दहावी बोर्डच्या परीक्षेत पास होऊ शकला नव्हता.