1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 6 मार्च 2018 (11:15 IST)

काँग्रेस लवकरच जिंकेल जनतेचा विश्वास : राहुल

rahul gandhi
नॉर्थ ईस्टच्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जनादेशावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया आली. त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. काँग्रेस लवकरच जनतेचा विश्वास जिंकेल. त्रिपुरा आणि नागालँडध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला, तर मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही त्यांची सत्ता येण्याची शक्यता कमी आहे. या निवडणुकांच्या निकालांच्यावेळी राहुल आजीकडे इटलीत गेले होते. आता ते भारतात परतले आहेत.
 
काँग्रेस त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयच्या जनतेने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करीत आहे. ईशान्येतील राज्यांत पकड जबूत करण्यासाठी काँग्रेस काम करेल आणि पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करेल. पक्षाच्या विजयासाठी मेहनत करणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.