1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

किसान लाँग मार्चः या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

Mumbai news
३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई अशी पायपीट केली असून मुंबईत पोहचले आहेत. यांच्या मागण्या काय आहेत जाणून घ्या:

* संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव
* स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी
*  वनाधिकार कायद्याचीही अंमलबजावणी करा
*  बोंड अळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये भरपाई द्यावी
*  वीज बीलमाफी मिळावी
*  ऊसाला हमीभाव बंधनकारक करावा
*  पश्चिमेत नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात यावे 
*  नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न सोडवावा
*  संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना
*  कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा
*  दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा
*  साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा
*  विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा