सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करणार्‍या 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास

मुंबई- 55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करणार्‍या 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास ठोठावल्याची घटना मुंबईत घडली आहे. दोन वर्षांपासून महिलेवर नजर ठेवणार्‍या इसमाला तीन महिन्यांची कोठडी आणि 5 हजार रूपयांचा दंड मॅजिस्ट्रेट कोर्टाने सुनावला आहे.
 
दंडाची रक्कम तक्रारदार महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर स्टॉकिंग अर्थात नजर ठेवणे‍ किंवा पाठलाग हा भादंवि अन्वये दंडनीय अपराध मानला जातो. आरोपी इस्तेखार अन्सारीचा मुंबईतील शिवडी भागात व्यवसाय आहे. तक्रारदार महिला सँडहर्स्ट रोडमधील शाळेत जाताना आरोपी तिचा पाठलाग करायचा.
 
तिच्याशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने आरोपीने तिच्याकडे एकटक पाहणे हे स्टॉकिंग आहे आणि महिलेचा जबाब त्यासाठी पुरेसा असल्याचे कोर्टाने सांगितले. सकाळी साडेसातच्या सुमारास स्टेशनवर उतरल्यावर आरोपी आपल्याकडे रोखून पाहत आणि पाठलाग करत असे. आपण थांबवल्यावर तो थांबायचा. अनेकदा आपण त्याला पाठलाग न करण्याचे बजावूनही त्याने हा प्रकार थांबवला नाही.