शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (16:27 IST)

सामनाने घेतली राज यांची विस्तृत बातमी

शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या सामना वृतपत्रा मध्ये प्रथमच अनेक वर्षांनी राज ठाकरे यांची किंबहुना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विस्तृत बातमी छापली आहे. उद्धव आणि राज यांच्यातील दुरावा कमी होतो की काय असे सोशल मिडीयावर चर्चा सुरु झाली आहे. असे झाले तर खूप चांगले होईल मराठी माणूस खुश होईल असे हि सोशल मिडीयावर बोलले जात आहे. मात्र सामना ने याबाबतीत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र राजकीय विश्लेषकांनी याला काहीच महत्व दिलेले नाही. त्यांच्या नुसार जर एखादे वृत्त पत्र बातमी छापते तर त्यात गैर काहीच नाही, त्यांनी फक्त बातमी दिली असून कोणतही असा संदेश किंवा त्या प्रकारचे इशारा दिला नाही. ही फक्त एक बातमी असून त्या व्यतरिक्त काहीच नाही. मात्र सोशल मिडीया थोडी ऐकणारा आहे. आले त्यांच्या मनी तर तेच कखरे असे आहे.

सामनातील बातमीचा सारांश 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा लोकसभा निवडणुकीत मिळवण्यासाठी तयारीला लागले असून दाऊदला हिंदुस्थानात परत आणून निवडणूक जिंकण्याचा डाव आखला जात आहे. मात्र यात मोदींचं कर्तुत्व नसून अनेक दुखण्यांनी त्रासलेला दाऊदच स्वत: केंद्र सरकारशी सेटिंग करत असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

देशातील जनतेला लुभावण्यासाठी पंतप्रधान मोदी अधूनमधून काही इव्हेंट्स करत असतात. आधी स्वच्छ भारत, मग नोटाबंदी पण या दोन्ही योजना फसल्या आहेत. मग गुजरातच्या निवडणुकांआधी तिथल्या जनतेला भुलवण्यासाठी बुलेट ट्रेनचं भूमिपूजन या गोष्टी करून झाल्या आहेत. त्यामुळे आता नवीन आणखी काही तरी इव्हेंट शोधतील. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी दाऊदची खेळी करण्याचं ठरवलं असल्याची माहिती आपल्याला कळाली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा लोकसभा निवडणुकीत मिळवण्यासाठी तयारीला लागले असून दाऊदला हिंदुस्थानात परत आणून निवडणूक जिंकण्याचा डाव आखला जात आहे. मात्र यात मोदींचं कर्तुत्व नसून अनेक दुखण्यांनी त्रासलेला दाऊदच स्वत: केंद्र सरकारशी सेटिंग करत असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.