शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2017 (17:00 IST)

मनसेने पुन्हा मराठीचा मुद्दा हाती घेतला

मनसेने मुंबईतील दादर आणि माहिममधील दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्या हटवल्या आहेत. दादरमधील एका ख्यातनाम ज्वेलर्सवर आणि माहिममधील एका हॉटेलवर मनसेने धडक दिली होती.

लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेची पिछेहाट झाली असून पराभवांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कार्यकारिणीत बदल केले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करुन पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मनसेने पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला आहे. दादरमधील ख्यातनाम पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स आणि माहिममधील शोभा हॉटेलवर गुजराती भाषेतील पाटी लावल्याचे समोर आले होते. हा प्रकार समजताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानांवर धडक दिली आणि गुजराती भाषेतील पाटी हटवण्यास सांगितले. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गुजराती भाषेतील पाटी हटवण्यात आली.