सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (17:25 IST)

राज ठाकरेंकडून सर्व सरकारी, खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा व महाविद्यालयांना पत्र लिहले आहे. 

देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी उदविग्न होऊन हे पत्र लिहित असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

शैक्षणिक संस्थेत येणारे सर्व विद्यार्थी तुमच्या मुला-मुलीसारखे असतात. शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनाने आणि सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली तर त्यांचे कोणीही काहीही वाकडं करु शकणार नाही, असे राज यांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज वाटल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.