सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (11:17 IST)

ऊर्जामंत्र्याच्या कार्यक्रमालाच महावितरण ने टाकला आकडा केली वीज चोरी

नाशिकमध्ये राज्याचे  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  उपस्थिती नूतन  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेली वीज ही आकडे टाकून उपलब्ध केली होती असे समोर आले आहे.. मात्र त्यावर सारवासारव करत सदरची वीज ही जनरेटच्या मदतीने घेतली असल्याचे अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले. थेट ऊर्जामंत्र्याचा  कार्यक्रम वीज चोरी न  विजेची कमतरता याच्यात सापडलेला पहायला मिळाला.

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आले.जिल्ह्यातील १० वीज उपकेंद्रांचे लोकार्पण आणि ७ उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. सोबतच वीज ग्राहकांशी संवादाचे आयोजन होते.. नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या इच्छामणी मंगल कार्यालयात सदरचा कार्यक्रमासाठी लागणारी वीज चक्क आकडे टाकून घेण्यात आल्याचे दिसून आले. माध्यम प्रतिनिधीकडून विचारणा सुरु झाल्यावर मात्र अधिकाऱ्यानी सारवासारव सुरु केली. आकडे टाकले असले तरी त्याचा वापर केला गेलेला नाही, सदरची ही पर्याय सोय केलेली आहे, वीज जनरेटच्या माध्यमातून घेतली आहे, विजेचे मीटर लावले जात आहे अशी उत्तरे देतांना अधिकारी वर्ग दिसून आला.

यासगळ्या उत्तरांची जुळवाजुळव करत असतांना मात्र दिसत असलेली वीज चोरी काही केल्या लपवता आली नाही. त्यामुळे एकीकडे ग्राहकांनी वीज चोरी करू नये असे ऊर्जामंत्री सांगत असतांना त्याच कार्यक्रमात वीज चोरी सर्रासपणे केली गेली.