बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: ब्रुसेल्स (बेल्जियम) , बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (08:10 IST)

बेल्जियन महापौरांची गळा चिरून हत्या

एका बेल्जियन महापौरांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. महापौरांचा खुन्याला नंतर अटक करण्यात आल्याचीही माहिती पोलीसांनी दिली आहे. मूस्क्रॉन शहराचे महापौर अल्फ्रेड गॅडेन (71) यांची सोमवारी संध्याकाळी त्यांच्या राहत्या घराजवळ्च तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली. महापौर अल्फ्रेड गॅडेन हे आपल्या घराजवळच असलेल्या दफनभूमीच्या देखरेखीचे काम करत असत. रोजच्या सवयीनुसार ते संध्याक़ाळी दफनभूमीचे प्रवेशद्वार बंद करण्यासाठी गेले होते. बराच वेळ ते परत न आल्याने त्यांची पत्नी त्यांना शोधायला गेली असता अल्फ्रेड गॅडेन हे रक्ताच्या थारोळ्यात पडस्लेले तिला आढळले. तीक्ष्ण हत्याराने त्यांचा गळा चिरण्यात आला होता.
 
अल्फ्रेड गॅडेन यांचा खुनी पोलीसांच्या स्वाधीन झाला आहे. हा खुनी एक तरुण मुलगा असून तो मूस्क्रॉन शहराचाच रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी-सन 2015 मध्ये महापौर अल्फ्रेड गॅडेन यांनी त्याच्या वडिलांना नोकरावरून कमी केले होते. ज्यामुळे नंतर त्यांनी आत्महत्या केली आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड म्हणून आपण अल्फ्रेड गॅडेन यांची हत्या केल्याचे त्याने कबूल केले.
 
महापौर अल्फ्रेड गॅडेन हे एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मृत्यूबद्दल समाजातील सर्वच थरांतून दु:ख व्यक्त होत आहे. पंतप्रधान चार्ल्स मिच्वेल यांनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.