रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (17:27 IST)

जपान पंतप्रधान आबे याचे भारतात जोरदार स्वागत

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आले आहे. या दरम्यान ते  अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत 8 किमीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रोड शो केला.  यावेळी अहमदाबाद विमानतळावरही जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंची खास व्यवस्था करण्यात आली आहे. शिंजो आबेंच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीनं हजर राहिले आहेत. बुलेट ट्रेनचा उद्या भूमिपूजन सोहळा होणार असून, यानिमित्तानं शिंजो आबे भारताच्या दौ-यावर आले आहेत. त्यांच्या या भेटीत गुजरातमध्ये गुंतवणुकीचे 15 करार होणार आहेत.

अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंतच्या या आठ किलोमीटरच्या मार्गावरील रोड शोमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. या  आठ किलोमीटर रोड शो च्या  मार्गामध्ये साबरमती रिव्हरफ्रंटचाही समावेश होता. एकूण 28 छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. जिथे 28 राज्यातील कलाकार आपल्या पारंपारिक वेशभूषेत नृत्यकला सादर केली.