1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (17:12 IST)

डेरात सापडले महागडे ३ हजार ड्रेस, १५०० शूज, अलिशान गाड्या

ram rahim

बाबा राम रहिमच्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाची निमलष्करी दल आणि हरयाणा पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. झाडाझडतीच्या दुसऱ्या दिवशी महागडे ३ हजार ड्रेस, १५०० शूज, अलिशान गाड्या आणि रोख रक्कम असा ऐवज तपास पथकांच्या हाती लागला आहे. 

राम रहिमच्या खोलीत चारही बाजूंना मोठी कपाटे आहेत. या कपाटांमध्ये तब्बल तीन हजार महागडे ड्रेस मिळाले आहेत. हेच महागडे कपडे परिधान करून बाबा राम रहिम त्याच्या भक्तांसमोर जात असे. यामध्ये त्याने चित्रपटात वापरलेल्या कपड्यांचाही समावेश आहे. त्यातील अनेक सूटची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगितले जाते. तसेच राम रहिमच्या या खोलीत १५०० शूज सापडले आहेत. त्यांचीही किंमत लाखोंच्या घरात आहे.