मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (17:08 IST)

जावेद हबीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्याविरुद्ध हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरात जावेद हबीब यांच्या मालकीच्या सलून्सची चेन आहे. त्यांच्या जाहिरातीसाठी काही दिवसांपूर्वी देशभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या. मात्र, या जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे अपमानजनक चित्रीकरण होत असल्याचा आरोप करत हैदराबाद येथील वकील करूण सागर यांनी सईदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याच्या २९५ अ या कलमातंर्गत जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल केला.