सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (11:54 IST)

अंधश्रद्धेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन....

अंधश्रद्धेला खतपाणी घालून समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल हवामान तज्ञ डॉ. मेधा खोले यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसने निदर्शने करून शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. 

युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिल्लारे  यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी नगर एसटी स्टँडच्या समोर डॉ. खोले यांच्या निवास स्थानासमोर हे निदर्शने आंदोलन झाले. डॉ. खोले यांनी अंधश्रद्धा बाळगून समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन केल्याबद्दल आंदोलनात सहभागी झालेल्या युवतींनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

मनाली भिलारे म्हणाल्या, ''देशाची वाटचाल 21 व्या शतकाकडे होत असताना समाजात वाद निर्माण करणे, जातीय संघर्ष निर्माण करणे हे चुकीचे आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. त्यासाठी संघर्ष करावा लागला तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस आघाडीवर असेल तसेच खोले प्रकरणात दाखल झालेला गुन्हा सामोपचाराने मागे घ्यावा, अशीही मागणी आम्ही करीत आहेत. तसेच या प्रकरणाला जातीय रंग दिला जाऊ नये, असे आवाहन मी या ठिकाणी करते"
या आंदोलनात भिलारे यांच्या नेतृत्वाखाली युवती पदाधिकार रिना शिंदे,शिवानी माळवदकर,सोनाली गाडे,कोमल टिंगरे,तेजवंती कपले,अक्षता राजगुरू,मेघा पंडित,स्नेहल शिंनगारे, मयूरी हांडोरे ,योगिता रोकडे व आदी युवती सदस्य व शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष शैलेश बडदे, राष्ट्रवादीच्या काॅंग्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बापू धुमाळ देखील उपस्थित होते.