शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (11:20 IST)

दहशतवादी संघटना कार्यरत असल्याची पाकची कबुली

चीनमधील ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यात आला. यानंतर लगेचच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दहशवादविरोधी भूमिका घेत देशाच्या नेतृत्त्वाला सकारात्मक मार्गावरुन वाटचाल करायची इच्छा बोलून दाखवली.

याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय मिळत असल्याची टीका केली होती. ब्रिक्स परिषदेतील घोषणापत्रात दहशतवादी संघटनांच्या नावांचा समावेश झाल्यानंतर पाकिस्तानने या मुद्यावरील भूमिकेत बदल करण्याची तयारी दर्शवल्याचे चित्र दिसते आहे. या मुद्यावर भाष्य करताना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटना पाकिस्तानात सक्रीय असल्याचे विधान परराष्ट्रमंत्री आसिफ यांनी केले. पाकिस्तानच्या एखाद्या मंत्र्याने असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.