मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (13:02 IST)

चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन युवती वर केला बलात्कार

तेवीस वर्षीय नराधमाने चाकूचा धाक दाखवून  17 वर्षीय युवतीवर सातत्याने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. ठाणे येथील  पीडित युवतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये  पोलिसांनी आरोपी अश्‍विन टर्पे (23) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर रोड   17 वर्षीय युवती येथे राहते. ती मोलमजुरी आणि इतर छोटी मोठी कामे  करते.आरोपी अश्‍विन टर्पे (रा. तुर्फेपाडा, शरद म्हात्रेंची चाळ, ब्रह्माण्ड ठाणे) पीडित युवतीची  याच्याशी ओळख  झाली. आरोपी  टर्पे याने तरुणीला घरी बोलवले होते.  तिला ब्रह्माण्ड शिवनेरी टॉवरसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये नेत चाकूचा धाक दाखवत  अत्याचार केला आहे. मात्र एकदा न करता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने धाडस दाखवत अखेर कासारवडवली पोलीसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. संशयित आरोपी टर्पे फरार  आहे.