मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (12:59 IST)

फँड्री ने दगड नाही तर कोयत्याने वार केला

सैराट फेम नागराज मंजुळे यांच्या चित्रपट फँड्री सर्वाना माहित आहे. यामध्ये नायक फँड्री हा शेवटी व्यवस्थेवर दगड मारतो असे दाखवले आहे, मात्र खऱ्या आयुष्यात मात्र वेगळे झाले आहे. यामध्ये फँड्री ने कोयत्याने वार केले आहेत. झाले असे की एका 15 वर्षांच्या मुलाचे मित्रांनी फँड्री असे टोपणनाव पाडले होते. तर त्याचा मित्र असललेल्या दुसऱ्या १५ वर्षीय मित्राने त्याला याच नावाने चिडवायला सुरुवात केली होती. तेव्हा राग अनावर झालेल्या मित्राने कोयता आणला आणि चिडवत असलेल्या मित्रावर वार केले आहे.ही घटना पिंपरी येथील मोहननगर येथील एका शाळेसमोर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी वार करणार्‍यास ताब्यात घेतले असून, जखमीवर उपचार सुरू आहेत. 

यामध्ये वैभव जितेंद्र मोरे (15, रा. फुलेनगर, चिंचवड) असे जखमी झाला आहे. त्याच्या मित्राने त्याच्या  डाव्या हातावर कोयत्याने वार केला आहे.  जखमी वैभवला ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला आणि वैभव हे दोघे मोहननगर येथील गीतामाता शाळेत शिक्षण घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बाल हक्क कायदा आणि कोर्टाच्या निर्देशानुसार जर १८ वर्षा पेक्षा अर्थात अल्पवयीन असेल जर त्याने काही गुन्हा केला असेल तर त्याची ओळख अथवा नाव प्रसिद्ध करता येत नाही.