रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (12:15 IST)

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्या रायन स्कूलविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

हरियाणा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. गुरुग्राम येथे घडलेल्या या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उत्तर मुंबई जिल्ह्याच्यावतीने कांदीवली पूर्व येथील रायन इंटरनेशनल स्कूलसमोर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रायन इंटरनेशनलच्या गेटसमोर प्रचंड घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्यावतीने रायन इंटरनेशनल स्कूलच्या प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

शाळेतील कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती शाळेच्या प्रशासनाकडे उपलब्ध असावी, शाळेच्या बस कॉनट्रॅक्टर आणि सुरक्षारक्षकांची जबाबदारीही शाळेचीच असावी, शाळेच्या स्वच्छतागृहाबाहेर तसेच शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमरे असावेत, अशा प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या निवेदनात करण्यात आल्या.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रस पार्टीच्या उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, तालुकाध्यक्ष विष्णू पवार, चारकोप तालुकाध्यक्ष कैलाशराव देशमुख आणि पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला.