बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (11:24 IST)

नाशिक सायक​​लि​स्ट्सतर्फे 'नवरात्र सायकल वारी'चे आयोजन

​​लिस्ट्स फाउंडेशनतर्फे सालाबाद 'नवरात्र सायकल वारी'चे आयोजन करण्यात आले असून या वारी दरम्यान नाशिक जिल्ह्यातील विविध शक्तीपीठांना भेट देण्यात येणार आहे.
 
२१ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सर्वच स्तरावर जोरदार सुरू आहे. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेच्या मंदिरासह शहरातील विविध देवी मंदिरांत मंडप टाकले जात आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध शक्तीपीठांमध्येही जय्यत तयारी सुरू आहे. नाशिक सायकलिस्ट्सतर्फेही भगूर, कोटमगाव, वणी, चांदवड या ठिकाणी सायकलवारी करत आदिशक्तींचे दर्शन घेतले जाणार आहे.
 
नवरात्र सायकल वारी दरम्यान २२ सप्टेंबर रोजी पहिली वारी भगूर येथील रेणुका देवी मंदिरापर्यंत करण्यात येणार आहे. २३ सप्टेंबरला वणी येथील श्री सप्तशृंगी देवी संस्थान, २४ सप्टेंबरला कोटमगाव येथील श्रीक्षेत्र जगदंबा संस्थान तर २६ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक श्रीक्षेत्र चांदवड रेणुका देवी संस्थान येथे भेट देण्यात येईल. वरील वारींची जबाबदारी अनुक्रमे डॉ. मनीषा रौदळ, मोहन देसाई, डॉ. आबा पाटील, नाना फड यांच्याकडे देण्यात आली आहे.
 
नवरात्र सायकलवारी दरम्यान होणाऱ्या या सर्व वारींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरासह चांदवड, मालेगाव, सिन्नर, सायखेडा, येवला, पिंपळगाव येथील सायकलिस्ट्सही या नवरात्र सायकल वारीमध्ये सहभाग नोंदविणार आहेत. जास्तीतजास्त नाशिककरांनी या नवरात्र वारीमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीण खाबियांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0253-2502614 या क्रमांकावर संपर्क करावा.