सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (17:19 IST)

उ.प्र. : यमुना नदीत बोट बुडून १५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बागपतजवळ यमुना नदीत  बोट बुडून झालेल्या  दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बागपत शहराजवळील काठा गावातील ग्रामस्थांची शेती यमुनेजवळ आहे. काही ग्रामस्थ यमुना नदीतून बोटीतून शेतावर जात होते. या बोटीत जवळपास ६० जण होते, असे सांगण्यात येत आहे. यमुना नदीत ही बोट बुडाली. बोटीतून क्षमतेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.