1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (12:23 IST)

भारताला बुलेट ट्रेनचं पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांनी केलं

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केले भूमिपूजन. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भाषणाची सुरुवात नमस्कार असं म्हणून केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
 
- भारतात जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे मनापासून स्वागत 
- गती, प्रगती, तंत्रज्ञान आणि विकास हे बुलेट ट्रेनचं वैशिष्ट्य ठरेल
- बदलाच्या दिशेने आज भारताने मोठं पाऊल टाकलं आहे
- बदल होणं खूपचं गरजेचं आहे
- बुलेट ट्रेनमध्ये सुविधा आणि सुरक्षाही आहे,शिवाय यामुळे रोजगारदेखील उपलब्ध होणार आहेत 
- भारत आणि जपानमधील नात्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि भावनात्मक आहे
- आज या प्रकल्पाचं कमी कालावधीत भूमिपूजन होते आहे तर याचे संपूर्ण श्रेय शिंजो आबे यांचे आहे
- हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे मोठी आर्थिक प्रगती
- बुलेट ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात इंधन बचत होण्यास मदत
- मुंबई-अहमदाबाद शहरातील अंतर कमी होईल
 
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या भाषणातील मुद्दे
- बुलेट ट्रेनमुळे भारत-जपानचे संबंध अधिक दृढ
- जपानमधील बुलेट ट्रेन सेवा अत्यंत सुरक्षित 
- जपानमध्ये एकही ट्रेन दुर्घटना नाही 
- जपानमधून 100 इंजिनिअर भारतात दाखल
- जपानच्या पंतप्रधानांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी असलेले नेते  
 
- जपानचा ''ज'' आणि इंडियाचा ''इ'' एकत्र केल्यास 'जय' शब्द निर्माण होतो, असे सांगत आबे यांनी 'जय जपान, जय इंडिया'चा नारा दिला
- पुढच्या वेळी मी बुलेट ट्रेनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतात येईन
- मला गुजरात खूप आवडतं
- शिंजो आबे यांनी आपल्या भाषणाचा शेवट 'धन्यवाद' नं केली
आजचा दिवस देशासाठी खूप ऐतिहासिक असा आहे -  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
आजपासून आधुनिक भारताचा पाया रचला जात आहे -  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
या प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेला चालना मिळेल आणि लोकांसाठी रोजगार उपलब्ध होतील - पीयूष गोयल, रेल्वे मंत्री
ही बुलेट ट्रेन जपान आणि भारतातील लोकांमधील बंधुत्वाचे प्रतीक आहे -  पीयूष गोयल, रेल्वे मंत्री