शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (17:35 IST)

अबब दोन डोक्‍यांचा रॅटलस्नेक

अमेरिकेच्या आर्कान्सास राज्यातील जोन्सबोरो येथील क्विंटीन ब्राऊन आणि रॉडनी केल्सो यांना  दोन डोक्‍यांचा रॅटलस्नेक त्यांच्या घराजवळच सापडला. तेथे असलेल्या एकूण तीन रॅटलस्नेक्‍सपैकी दोन नेहमीसारखेच होते, पण हा तिसरा मात्र वेगळा होता. त्याला दोन डोकी होती. हा दोन डोकी असलेला रॅटलस्नेक त्यांनी एका बॉक्‍समध्ये पकडला. त्याचे फोटो काढून त्यांनी ते फेसबुकवर अपलोड केले आहेत. ड्यूस असे नाव दिलेला हा रॅटलस्नेक सुमारे 11 इंच लांबीचा आहे.

हा दोन डोक्‍यांचा रॅटलस्नेक त्यांनी नंतर जोन्सबोरो येथील रिज नेचर सेंटरला दिला आहे. दोन डोकी असलेला साप म्हणजे प्रत्यक्षात जोडले गेलेले दोन साप असतात. दोन डोकी असलेला साप नैसर्गिक वातावरणात फार काळ जगू शकत नाही.