बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अमित शहांचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना टोला

अपयशी ठरलेल्या नेत्यांचे देशात कोणीही ऐकत नाहीत. त्यामुळेच अपयशी नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात, अशा शब्दांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना टोला लगावला. ‘अयशस्वी नेते भाषणे देण्यासाठी अमेरिकेला पळतात. कारण मायदेशात त्यांचे कोणीही ऐकून घेत नाही,’ असे म्हणत शहांनी नाव न घेता राहुल यांच्यावर निशाणा साधला.

कोलकात्याच्या दौऱ्यावर असलेल्या शहांनी सदरची  प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधींनी  अमेरिकेती बर्कले विद्यापीठात भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयांवरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले. राहुल यांच्या या भाषणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे.