बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:46 IST)

सामनाची मुंबई कुलगुरूंवर झहरी टीका, निकालांचे श्राद्ध - उद्धव ठाकरे

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या परीक्षेत नापास झाले आहेत. यावरुन सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे. वाचा सामना ने काय टीका केली आहे ती

मुंबई विद्यापीठाचे वैभवशाली टॉवर झडताना व पडताना दिसत आहेज्या विद्यापीठाने अनेक पिढय़ा घडवल्या ते विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालताना दिसत आहेसंघविचाराचे आहेत म्हणून कुलगुरूंना माफी नाहीत्यांना जावेच लागेलकुलगुरूंची वकिली करणाऱ्यांच्या जिव्हा झडून जातील व लाखो विद्यार्थ्यांचे तळतळाट त्यांना लागतीलमुंबई विद्यापीठातील अनागोंदीमुळे चार लाख विद्यार्थ्यांच्या जीवनात जे खड्डे’ पडले आहेत त्यावरही कुणी तरी आता ‘‘मुंबईतुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!’’ असे गाणे वाजवायला हरकत नाही!

अनागोंदीची जबाबदारी
शिक्षण मंत्री तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंवर तर जातेच, पण इतका बेफिकीर, अकार्यक्षम कुलगुरू नेमणाऱ्या सरकारवरदेखील जाते. नव्या राजवटीत कुलगुरू निवडीचा घोटाळा झाला आहे व तो गंभीर आहे. राज्यपालांच्या नेमणुका या संघविचारक आणि प्रचारकांच्याच झाल्या आहेत. देशात प्रथमच संघविचारक व प्रचारक हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान बनले आहेत, पण निदान पिढी घडवणाऱ्या शैक्षणिक संस्था तरी त्यातून सुटाव्यात व ‘मेरिट’वर या नियुक्त्या व्हाव्यात. संघविचार हा गुन्हा नाही व त्या विचाराने कुणाचे नुकसान होणार नाही. आम्ही तर सरसंघचालकांचेच नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले होते, पण सध्या मुंबई विद्यापीठाची जी घसरण सुरू आहे ती पाहता सरसंघचालक कुलगुरूंना व त्यांना नेमणाऱ्यांना काठीने फोडून काढतील असे चित्र आहे.