मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

चिन्मयी सुमीत समोर केले ड्रायवरने अश्लिल वर्तन

समाजातील विकृती आणि महिला सुरक्षाव्यवस्था कुचकामी हे पुन्हा समोर आले आहे. यामध्ये आर्थिक राजधानी येथे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी महिलांसमोर हस्तमैथुन करण्याच्या घटना वाढल्या आहेत. असाच घाणेरडा प्रकार अभिनेते सुमीत राघवन यांची पत्नी चिन्मयी सुमीत यांना असाच धक्कादायक अनुभव आला आहे. यामध्ये अभिनेत्री चिन्मयी सुमीत विलेपार्लेजवळच्या पार्लेटिळक शाळेजवळ होत्या. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारमधील चालकाने चिन्मयी यांच्या समोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.  या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या आहेत. 
 
चिन्मयी त्या चालकाला मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावल्या होत्या . मात्र हा विकृत  त्यावेळी तो तिथून पळून गेला होता . आरोपीने राखाडी रंगाचा सफारी परिधान केला होता. 1985 हे शेवटचे चार डिजिट आहेत. अभिनेते सुमीत राघवन यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.