मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

छिंदमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अहमदनगर - येथील महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दिवसभरात आंदोलने, जनक्षोभ उसळल्यानंतर रात्री छिंदम याला सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात पोलिसांनी अटक केली.
 
छिंदम याच्या वक्तव्यावरून नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने न्यायालय आवारात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गांधीगिरी केली. सरकारी वकिलांच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे सकाळी लवकर कामकाज घेण्याची विनंती केली.
 
ही बाब अतिशय गोपनीय ठेवण्यात आली. त्यानुसार सकाळी लवकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखानाचे निरीक्षक सुरेश सपकाळे आदींनी निवडक कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात छिंदम याला न्यायालयात आणले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर तात्काळ त्याला सबजेलमध्ये हलविण्यात आले.