गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजप उपमहापौर छिंदम यांनी वापरले शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द

Maharashtra news
अहमदनगरमध्ये भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. याबाबतचा छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हॉट्सअॅपसह व्हायरल झाली आहे. सध्या अहमदनगर शहरात तणाव निर्माण झाला आहे.
 
या कथित क्लिपमध्ये एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदम यांनी फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली आहे.
 
या क्लिपनंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. श्रीकांत छिंदम यांच्याविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला, तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेध केला आहे.