बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (15:25 IST)

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या सारा तिचा आगामी चित्रपट 'कूली नंबर 1' च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. नुकताच एका शोमध्ये साराने रोहित शेट्टीला त्याच्या गोलमाल सीरिजच्या पुढच्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून घेण्यास विनंती केली आहे. त्यावर गोलमाल चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला देखील हसू येईल. गोलमाल सीरिजच्या पुढच्या चित्रपटासाठी तुम्हाला कुणी अभिनेत्री मिळाली आहे का? असा प्रश्न साराने रोहित शेट्टीला विचारला. त्यावर रोहितने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल. 
 
जेव्हा कधी गोलमाल सीरिजचा पुढचा चित्रपट येईल तेव्हा मी तुलाच अभिनेत्री म्हणून घेईन असे रोहित म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून सारा आनंदी होते. मात्र त्यानंतर रोहितने लगेच दिलेल्या उत्तराने साराचा हिरमोड झाला आहे. रोहित मजेशीर अंदाजात म्हणतो या कार्यक्रमात  मस्ती आणि मजाक करण्यास सांगितले आहे.