शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘तान्हाजी' वादात सापडला, आव्हाड यांची ट्विटवरुन धमकी

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर  प्रदर्शित झाला. मात्र या ट्रेलरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विटवरुन या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना थेट धमकीच दिली आहे.
 
आव्हाड यांनी ओम राऊत यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाचा आरोप केला आहे. “ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल,” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर “याला धमकी समजली तरी चालेल,” असंही आव्हाड या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.