मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (17:09 IST)

जेव्हा काजोल स्वतःचीच गाडी विसरते!

शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणार्‍या ' तान्हाजीः द अनसंग वॉरियर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण तान्हाजींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर काजोल तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजेच सावित्रीबाईंच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सध्या या दोघांची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत आहे. 
 
त्यातच काजोलचा एक व्हिडिओ व्हारल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती चुकून स्वतःची गाडी सोडून दुसर्‍याच एका गाडीमध्ये बसायला जात असल्याचं दिसून येत आहे. अलीकडेच काजोल मुंबईमधील जुहू येथे एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेली होती. ही पार्टी संपल्यानंतर ती गाडीत बसण्यासाठी जात होती. मात्र ती ज्या गाडीमध्ये बसायचा प्रयत्न करत होती ती गाडी तिची नव्हतीच. चुकून ती स्वतःच्या गाडीत बसणऐवजी दुसर्‍या गाडीच्या दिशेने वळाली. मात्र वेळीच तिची चूक लक्षात आल्यामुळे ती लगेच तिच्या गाडीकडे वळाली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिावर व्हारल होत आहे.