रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 डिसेंबर 2019 (10:58 IST)

कार्तिक आर्यन करणार का सारा अलीखान सोबत ब्रेकअप?

अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या बर्‍याच चर्चा झाल्या मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. याआधी सगळीकडे एकत्र दिसणारे कार्तिक आणि सारा आता एकमेकांच्या समोर येणंही टाळताना दिसतात. मागच्या काही दिवसांपासून कार्तिक आणि अनन्या पांडे यांच्यात जवळीक वाढल्याचं दिसत आहे. पण आता कार्तिकचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो करिना कपूरसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. 
 
कार्तिक आर्यननं नुकतीच करिना कपूरचा रेडिओ शो 'व्हॉट वुमेन वॉन्ट'मध्ये हजेरी लावली. यावेळी तो रिलेशनशिप या विषयावर बोलला. दरम्यान या  शोमध्ये करिना कपूरनं कार्तिकला काही प्रश्र्न विचारले त्यातील एक प्रशन असा होता. कपल गोल्ससाठी कोणती जोडी तुझ्या मते बेस्ट आहे.
 
त्यावर कार्तिक सैफ-करिनाचं नाव घेतो मात्र करिना त्याला असं न करण्याविषयी सांगते. त्यानंतर कार्तिक काही विचार करतो आणि तिला विचारतो, 'पण तू लग्र का केलं' यावर करिना लाजते आणि मग म्हणते की, 'कार्तिक खूप बदमाश आहे.'