गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जानेवारी 2020 (14:03 IST)

'ती' अंगठी श्रद्धाने केली परत

कलाविश्वामध्ये दररोज ब्रेकअप आणि पॅचअपच चर्चा रंगत असतात. त्यामुळे या चर्चा बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवीन नाहीत. आतापर्यंत अफेअर्सच्या चर्चांमध्ये अनेक कलाकारांची नावं चर्चिली गेली आहेत. यात अभिनेत्री श्रद्धा कपूरचं नावही आवर्जून घेतलं जातं. आतार्पंत श्रद्धाचं नाव आदित्य रॉय कपूर, फरहान अख्तर यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. 'लंडन ड्रीम्स'मधून करिअरला सुरुवात करणार्‍या आदित्य रॉय कपूरला 'आशिकी-2' या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरने स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं.
 
मात्र त्यांच नातं फार काळ टिकलं नाही असं म्हटलं जातं. 'दावत-ए-इश्क' या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आदित्य एका ज्वेलरी शॉपमध्ये गेला होता. यावेळी त्याने तब्बल 25 लाख रुपयांची अंगठी खरेदी केली होती. ही अंगठी त्याने विकत घेतल्यानंतर बर्‍याच जणांनी अंगठी कोणासाठी असा प्रश्र्न विचारला होता. मात्र या प्रश्नावर तो केवळ हसला आणि नाव न सांगताच निघून गेला. परंतु काही दिवसानंतर हीच अंगठी श्रद्धाच्या हातात पाहायला मिळाली.