1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (14:45 IST)

हृतिक आणि सुझान पुन्हा एकत्र!

hrithik-roshan-and-sussanne-khan-holiday-with-sons-and-their-modern-family
आजकाल बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची एक्स वाईफ व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. यावेळी फक्त हे दोघे एन्जॉय करत नसून त्यांची दोन मुलं आणि संपूर्ण कुटुंब एकत्र व्हेकेशनचा आनंद घेताना दिसले. सुझान खानने इन्स्टाग्राम अकाउंटवरून फॅमिली व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. यामुळे हृतिक रोशन आणि सुझान खानबद्दलची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 
तसंच सुझानने हृतिकसोबतदेखील फोटो शेअर केले आहेत. तिने या फोटोंना 'मॉडर्न फॅमिली' असं कॅप्शन दिलं असून ती कुटुंबासोबत मस्ती करताना दिसत आहे. हे सर्व फोटो शेअर करताना तिने असं लिहिलं आहे की, 'दी मॉडर्न फॅमिली - दोन मुलं, एक आई आणि एक वडील, चुलत भाऊ, बहीण, आजी-आजोबा, आणि दोन मित्र. नवीन बंध. आयुष्यात रोजचा दिवस एखाद्यास सशक्त बनवते. 2020 मध्ये आम्ही इथे आहोत.' हृतिक रोशन आणि सुझान खान बर्‍याचदा मुलांसोबत सुट्टीच्या दिवशी एन्जॉय करताना दिसतात.