मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (15:33 IST)

'भुज'मध्ये परिणितीच्या जागी नोरा

Nora replaces Parineeti in 'Bhuj'
आपल्या नृत्यअदाकारीने तरुण पिढीला घायाळ करणारी नोरा फतेही आपल्या 'भुज द प्राईड ऑफ इंडिया'
या चित्रपटातून रसिकांसमोर येणार आहे. या चित्रपटात ती अजय देवगणसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. वास्तविक, नोराची वर्णी परिणितीच्या नकारामुळे लागलेली आहे. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. अभिषेक दुधैया दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सुरुवातीला परिणिती चोप्रा एका प्रुखम भूमिकेत झळकणार होती. पण अचानकपणाने तिला या प्रोजेक्टमधून बॅकआऊट व्हावं लागलं. त्यानंतर दुसर्‍या नायिकेच्या शोधात असतानाच नोरा फतेहीचा चेहरा समोर आला आणि तिच्या   नावावर शिक्कामोर्तबही झाले.
 
नोरा या चित्रपटात एका स्पाची भूमिका करणार आहे. नोराने आयटम साँगच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. स्ट्रीट डान्सर या थ्रीडी चित्रपटातून ती पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे.