बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:49 IST)

ठरलं, 'कभी ईद कभी दिवाली' सलमानच्या नव्या चित्रपटाचे नाव

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान २०२१च्या ईदच्या मुहुर्तावर एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान त्याचे चित्रपट ईदच्या दिवशीच प्रदर्शित करतो. सलमानने २०२१ मध्ये येणाऱ्या चित्रपटाचं नाव 'कभी ईद कभी दिवाली' असल्याचं ट्विट केलं आहे. 
 
'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. तर साजिद नाडियाडवाला आणि सलमान खान प्रोडक्शन चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चित्रपटाच्या इतर स्टारकास्टबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.