सोमवार, 20 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जानेवारी 2020 (11:52 IST)

‘छपाक’च्या अशा प्रमोशनवर नेटकरी नाराज

Netakari is offended at such a promotion of 'Chhapak'
सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा ‘छपाक’चं प्रमोशन करणारा टिक टॉक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. परंतु ज्या पद्धतीने तो व्हिडीओ शूट केला आहे त्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
‘छपाक’चं प्रमोशन करण्यासाठी दीपिका आणि टिक टॉक स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाबीने एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये दीपिकाने फाबीला तिच्या आवडीच्या तीन चित्रपटांमधील लूक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज दिलं. यामध्ये ‘ओम शांती ओम’, ‘पीकू’ आणि ‘छपाक’ या चित्रपटांमधील दीपिकाचा लूक फाबीला रिक्रिएट करायचा होता. मात्र हे चॅलेंज नेटकऱ्यांना फारसं पटलं नाही. यात ‘छपाक’मधील लूक रिक्रिएट करण्यास सांगितल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.