बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 18 जानेवारी 2020 (12:52 IST)

मुलगी सारा अली खानचा 'लव्ह आज काल' चा ट्रेलर पाहतं सैफ म्हणाला - माझ्या चित्रपटाचे ट्रेलर जास्त चांगले होते

शुक्रवारी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे आणि या दरम्यान सैफ अली खाननेही ट्रेलरला आपली प्रतिक्रिया दिली आहे. सांगायचे म्हणजे की चित्रपटाच्या पहिल्या भागात सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते.
 
एका मुलाखतीदरम्यान ट्रेलरबद्दल विचारले असता सैफने सांगितले की, त्याने ट्रेलर पाहिला आहे आणि मुलगी सारा आणि चित्रपटाच्या बाकी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, सैफने असेही म्हटले की, त्याचा लव्ह लाजकलचे ट्रेलर त्याला जास्त आवडले होते.
 
ट्रेलर कसे आहे…
 
ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाची कथा पहिल्या भागासारखीच आहे, फक्त पात्र वेगळी आहेत.
 
साराची तुलना दीपिकाशी केली गेली तर दीपिका चित्रपटाच्या पहिल्या भागात जास्त परिपक्व दिसली होती, तर सारा थोडी बालिश वाटली. कार्तिक त्याच्या भूमिकेत परिपूर्ण दिसत होता. कार्तिकची चॉकलेट बॉय इमेज त्याच्या व्यक्तिरेखेला उत्तम प्रकारे सूट करते.
 
चित्रपटाचे तिसरे पात्र आरुषि शर्माचा लुक पहिल्या भागात असलेल्या गिसेली माँटीरोशी मॅच करत आहे, परंतु गिसेली चित्रपटात लाजाळू होती, तर आरुषि गीसेलीच्या उलट आहे.