शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2020 (16:10 IST)

अपघात शबाना आझमींचा आणि ट्रोल झाली उर्वशी

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्या लवकर बर्‍या व्हाव्यात यासाठी बॉलिवूडसह फॅन्सनी प्रार्थना केली आहे. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाही आहे. तिने आपल्या अकाऊंटवर ट्विट केलं आहे. उर्वशी म्हणाली, 'शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात अस्वस्थ करणारा आहे. त्या लवकर बर्‍या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते' हे ट्विट तिने इंग्रजीमधून केलं होतं.
 
मात्र उर्वशीने केलेल ट्विटमुळे नेटकरंनी तिला तुफान ट्रोल केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे की हे तो Ctrl C Ctrl V म्हणजेच कॉपी पेस्ट आहे असं नेटकर्‍यांच म्हणणं आहे. Ctrl C Ctrl V ही संगणकाची सांकेतिक भाषा आहे. याचा अर्थ कॉपी-पेस्ट करणं असा होतो. शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या बर्‍या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे.
 
'शबाना यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बर्‍या होणसाठी मी प्रार्थना करतो,' असं ट्विट मोदी यांनी केलं होतं. उर्वशीने केलेलं ट्विट हे कॉपी केल्याचं नेटकर्‍यांच म्हणणं आहे. उर्वशी आणि मोदी यांच्या ट्विटमध्ये साम्य आढळल्यानं नेटकर्‍यांनी ट्रोल केलं. उर्वशीने पंतप्रधान यांचं ट्विट कॉपी करून ट्विट केल्याचा आरोप होत आहे. 'उर्वशी कॉपी पेस्ट करण्यापेक्षा स्वतःचं लिही की', अशा पद्धतीच्या कमेंट्‌स करून आणि मीम्स तयार करून उर्वशीला ट्रोल करण्यात आलं आहे.