शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (11:01 IST)

सैफच्या लेकीचं रजनीकांत कनेक्शन माहितीये?

'केदारनाथ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळातच आपली जागा तयार केली. सैफ अलीखान याची ही लेक अशी काही प्रसिद्धीझोतात आली, की तिच्या अभिनासोबत घायाळ करणार्या अदांवर चाहते फिदा झाले. सध्या सारा चर्चेत आहे ते म्हणजे दोन कारणामुंळे. एक म्हणजे तिच्यासोबत खास नातं असणार्या कार्तिक आर्यन आणि तिच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटामुळे; आणि दुसरं म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी असलेल्या एका कनेक्शनमुळे. सारा, रजनीकांत हे नेमकं आहे तरी काय, असाच प्रश्र्न तुम्हालाही पडला ना? 
 
सारा लवकरच रजनीकांत यांचा जावई, धनुष याच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकणसाठी सज्ज झाली आहे. निमित्त आहे, 'अतरंगी रे' हा चित्रपट. नुकतंच तिच्या या चित्रपटाविषयीचा एक फोटोही प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये अभिनेता अक्षयकुमार, अभिनेत्री सारा अली खान आणि 'कोलावरी डी' फेम धनुष हे त्रिकूट दिसत आहे. मुख्य म्हणजे अक्षकुमार आणि धनुष हे दोघंही रजनीकांत यांना अतिश चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्यांच्यासोबतचा त्यांचा वावरही अनेकांचं लक्ष वेधणारा ठरतो. त्यातच आता साराला या दोन अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तिला बर्याच गोष्टी शिकाला मिळणार आहेत. आनंद एल. या चित्रपटाला ए.आर. रेहमानचं संगीत असणार आहे. दमदार कलाकारांच्या साथीने या चित्रपटाच चित्रीकरणास सुरुवात होणार.