सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑक्टोबर 2019 (10:00 IST)

डीटीएचसाठी नवा नियम, करा केवायसी

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)ने डीटीएच आणि केबलधारकांना चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य दिले. सोबतच ट्रायने जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्याचे ग्राहक आणि नवीन डीटीएच सबस्क्रायबर्स यांना हा नवा नियम लागू असेल. त्यानुसार सध्याच्या ग्राहकांना केवायसीसाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. तर नव्याने कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना आधीच केवासी करावे लागणार नाही. त्यानंतरच नवीन डीटीएच कनेक्शन सोबत मिळणारा सेट टॉप बॉक्स इन्स्टॉल करण्यात येईल.
 
 नव्या नियमानुसार ज्या ठिकाणी सेट टॉप बॉक्स लावायचा आहे तिथलाच पत्ता कनेक्शनच्या अर्जावर असणे आवश्यक आहे. ग्राहकांची ओळख पटावी म्हणून केबल ऑपरेटरच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येईल. त्यानंतर सेट टॉप बॉक्सच्या इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल. असे ट्रायच्या नव्या नियमात म्हटले आहे. मोबाईल नसणाऱ्या ग्राहकांना केबल ऑपरेटर्सना ओळखपत्र द्यावं लागणार आहे. ज्या ग्राहकांचा मोबाईल नंबर डीटीएचला लिंक नाही त्यांना २ वर्षात ते करुन घ्यावं लागणार आहे. केबल ऑपरेटर्सना ग्राहकांच्या पडताळणीची कागदपत्रे गोळा करण्याची परवानगी आहे. पण ट्राय सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या ठिकाणाची माहिती गोळा करता येणार नाही.