1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑक्टोबर 2019 (09:52 IST)

तीन दशकांनंतर आरबीआयने केली सोन्याची विक्री

तब्बल तीन दशकांनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोन्याची विक्री केलीय. जालान कमिटीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून आरबीआय गोल्ड ट्रेडिंगमध्ये ऍक्टिव्ह झाली. 
 
रिझर्व्ह बँकेच्या आठवड्याच्या अहवालानुसार, आरबीआयनं जुलै महिन्यापासून एकूण ५.१ अब्ज डॉलरचं सोनं खरेदी केलंय तर १.१५ अब्ज डॉलर सोन्याची विक्री केलीय. आरबीआयकडे ऑगस्टच्या शेवटपर्यंत १.९८७ करोड औंस सोनं होतं. तर ११ ऑक्टोबर रोजी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये २६.७ अब्ज डॉलरचं सोनं होतं.
 
जगभरातील सेंट्रल बँक (आरबीआयप्रमाणे) आपल्या फॉरेक्स एक्सचेंजचा काही भाग सोन्याच्या स्वरुपात ठेवतात. रिझर्व्ह बँक नोव्हेंबर २०१७ पासून सोन्याची थोडी-फार खरेदी करत आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास २० लाख औंस सोन्याची खरेदी आरबीआयनं केलीय.