शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (15:31 IST)

थोडा दिलासा, पीएमसी बँकेतून काढता येणार आता ५० हजार रुपये

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे. यानुसार वैद्यकीय किंवा शैक्षणिक खर्चाच्या कारणास्तव पीएमसी खातेधारकांना बँक अकाऊण्टमधून 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल.
 
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात ही  माहिती दिली असू, ‘पीएमसी बँक खातेदार आता मेडिकल/शिक्षण इमरजन्सीसाठी अधिक 50 हजार रुपये त्यांचा खात्यातून काढू शकणार’ असं सोमय्यांनी सांगितले आहे. मेडिकल इमर्जन्सी आणि  शिक्षण यासारख्या अत्यंत  अत्यावश्यक गरजेसाठीच खातेदाराला ही रक्कम काढता येईल. पीएमसी बँकेमधून रक्कम काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध रद्द करावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, येत्या 4 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार करण्आयात येणार आहे. पीएमसी बँक बुडाली तेव्हा या बँकेतील झालेला घोटाळा गंभीर स्वरूप  घेत आहे. या निर्बंधांविरोधात काही खातेधारकांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं. आर्थिक ताण सहन न झाल्यामुळे गेल्या काही दिवसात पाच खातेधारकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. बँकेबद्दल रिसर्व्ह बँक ३० ऑक्टोबर रोजी मोठी घोषणा करणार आहे.