शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (14:55 IST)

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच

नगर – दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सगळीकडे भरभराट असते. यामुळेच या दिवाळीच्या सणाला सगळ्यात जास्त खरेदी होते. वाहन, कपडे, सोने – चांदी यांची जोरदार विक्री होते, त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण असते. मात्र, गेल्या काही दिवसात सोनाच्या भावात तेजी आल्याने यंदा सोने – चांदे खरेदीकडे लोकांचा कल कमी आहे. त्यामुळे सराफा बाजार थंडावल्याचे चित्र आहे. जागतिक ट्रेडवारमुळे सोन्याचे भाव वाढल्याचे, व्यापाऱ्यांचे मत आहे.
 
सामान्य ग्राहक सोन्यात गुंतवणूक करण्याबाबत साशंक आहे, भाव कमी होतील, अस त्याला वाटतं त्यामुळे सध्या सराफा बाजारात गर्दी नाही. शिवाय, यंदा नोकरदार वर्गाचे पगार आणि बोनस हे दिवाळी नंतर होत आहेत, शेतकऱ्याच्या हातातलं पीक गेलेलं आहे, त्यामुळे सोने-चांदी कुणी खरेदी करत नाही, भाव स्थिरावले तर ग्राहक सोने खरेदीचा विचार करेल, असं सोने-चांदी व्यावसायिकांनी सांगितले.
 
बाजारात दिवाळी निमित्त सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ऑफर आहेत. पोखरणा ज्वेलर्स मध्ये जेवढं सोनं खरेदी कराल तेवढं चांदी फ्री मिळत आहे. शिवाय, कारागिराची रोजंदारी 400 रुपयांवर 250 रुपये केली. एक स्पिडकार, कुपन्स या ऑफर देखील आहेत.
 
सध्या बाजारात शुद्ध सोन्याचे भाव 38, 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, चांदी 460 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिवाळी नंतर दिवाळीनंतर सोन्याचे भाव 45,000 रुपये पेक्षा वर सोनं जावू शकतं तर चांदीचे भाव 46000 हजारापेक्षा वर जाऊ शकतात. चांदीचे भाव पाच हजारांनी वाढले आहेत.
 
बाजारात सध्या किरकोळ दागिन्याना मागणी आहे. यात कानातले, अंगठी यांना मागणी असून ब्रेसलेस, बांगडी या वस्तुंना कमी मागणी आहे. बाजारात सध्या सोने खरेदीला गर्दी नसली तरी, यंदा लग्नाच्या तिथी जास्त आहेत त्यामुळे लग्नसराईत चांगली सोने खरेदी होईल, असा विश्‍वास सराफा व्यावसायिकांना आहे.