शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (08:27 IST)

पी एम सी बँकेच्या बद्दल या तारखेला रिजर्व्ह बँक देणार महत्वपूर्ण निर्णय

सर्वाधिक हजारो कोटी रुपये थकीत कर्ज घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेसंबंधी रिझर्व्ह बँक (आरबीआय) ३० ऑक्टोबर रोजी मोठा निर्णय जाहीर कऱणार असून, आरबीआयने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता आरबीआय नक्की कोणता निर्णय घेते आणि गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना दिलासा मिळणार का हे तेव्हाचा समजणार आहे. 
 
बुडालेल्या पीएमसी बँकेच्या खातेधारक मागील अनेक दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत असून, त्पीयांनी पीएमसी खातेदारकांची आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. या महत्वपूर्ण बैठकीपूर्वी आरबीआयने सध्या आचारसंहिता लागू असल्याने निर्णय घेणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे. सोबतच आरबीआयने २५ आणि २७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं सांगितलं आहे. यावेळी आरबीआयने ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असंही आश्वासन दिले आहे. दरम्यान पीएमसी बँक घोटाळाप्रकणी अटकेत असणाऱ्या आरोपी राकेश वाधवन, सारंग वाधवन या दोघांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली असू,  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पीएमसी बँकेवर निर्बंध बजावले आहेत. सोबतच  पैसे काढण्यावर अनेक मोठ्या मर्यादा घातल्या आहेत. यामुळे दिवाळी सणात, आजारी आणि पेन्शन असलेले अनेक खातेधारक चिंताग्रस्त असून धक्क्याने दोन खातेदारांचा मृत्यूदेखील झाला आहे. काही खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करत पैसे काढण्यावर मर्यादा आणणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने आधीच चिंताग्रस्त असणाऱ्या खातेदारांच्या चिंतेत भर टाकली असून दिलासा देण्यास नकार दिला.