दक्षिण आफ्रिकेत चार मजली हिंदू मंदिर कोसळले; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण आफ्रिकेत एक हिंदू मंदिर कोसळले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण अडकले आहे. अशी माहिती समोर आली आहे. तसेच अंधार आणि परिसरात दुर्गमता असल्याने रात्री बचावकार्य थांबवावे लागले. सकाळपासूनच बचाव पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतील डर्बनच्या उत्तरेकडील भारतीय बहुल भागात असलेल्या रेडक्लिफमध्ये शुक्रवारी दुपारी चार मजली मंदिर अचानक कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. पहिला मृत्यू मंदिराच्या छतावर काँक्रीट ओतणाऱ्या कामगाराचा झाला. काँक्रीट ओतताच संपूर्ण इमारत कोसळली. मंदिर कोसळल्यानंतर ५४ वर्षीय भाविकाचाही मृत्यू झाला. रात्री १२:०० वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होते, परंतु कमी प्रकाश आणि धोक्यामुळे ते थांबवण्यात आले. शनिवारी सकाळी सूर्योदय होताच बचावकर्त्यांनी काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
Edited By- Dhanashri Naik