मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (12:19 IST)

जास्तकरून लोकांना रात्री येतात हे 7 प्रकारचे स्वप्न, जाणून घ्या प्रत्येकाचा अर्थ

रात्री झोपताना आम्हाला सर्वांना स्वप्न दिसतात. स्वप्न ज्योतिष्यानुसार प्रत्येक स्वप्नांचे विशेष अर्थ असतात. स्वप्नांना आमच्या भविष्याशी संबंध असतो. काही स्वप्न अशे असतात जे जास्तकरून लोकांना दिसतात.
 
1. उंचीवरून पडण्याचे स्वप्न
स्वप्नात कोणाला उंचीवरून पडताना दिसणे या गोष्टीचे संकेत आहे की तुमच्या मनात एखादे चुकीचे काम करण्याची इच्छा सुरू आहे. किंवा एखाद्या गोष्टीचे तुमच्या मनात भिती आहे.
 
2. पाठलाग करण्याचे स्वप्न
हे स्वप्न सांगतात की तुम्हाला एखाद्या कामापासून सुटकारा हवा आहे किंवा अशा कामांकडे दुर्लक्ष करण्याची इच्छा आहे.
 
3. स्वप्नात दात तुटणे
स्वप्नात दात तुटणे बघणे अशुभ आहे. दातांचा संबंध आत्मविश्वासाशी असतो. अशे स्वप्न व्यक्तीला त्रास देतात.
4. मरण्याचे स्वप्न बघणे
बर्‍याच वेळा स्वप्नात आम्हाला आमचा मृत्यू दिसतो. पण हे स्वप्न या गोष्टीकडे इशारा करतो की तुम्ही एखाद्या वाईट गोष्टीला मागेसोडून पुढे जाण्यासाठी तयार आहात. स्वप्नात दुसर्‍याची मृत्यू बघणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात काही नवीन होणार आहे.
 
5. सारखे सारखे पडण्याचे स्वप्न
स्वप्नात जर तुम्ही सारखे सारखे खाली पडत असाल तर समजा लवकरच तुमच्या मोठ्या अडचणी संपुष्टात येणार आहे.
6. उशीरा पोहोचणे किंवा ट्रेन सुटणे
उशीरा पोहचण्याचे स्वप्न या गोष्टींचे संकेत आहे की तुम्ही एखाद्या विशेष कार्यासाठी फारच गंभीर आणि उत्साही आहात.
 
7. पाण्याचे स्वप्न बघणे
स्वप्नात पाणी दिसणे अर्थात लवकरच तुम्हाला तुमच्या अडचणींपासून मुक्ती मिळणार आहे.